मूळव्याध लक्षणे आणि स्व- निदान
जर आपण मुळव्याधिच्या लक्षणांचा आणि आपल्याला झालेल्या आजाराची शक्यता पडताळून पाहत असाल तर तुमच्यासारखी हा लेख आहे.
दैनंदिन रुग्ण तपासताना असे लक्षात येते की बरेच रुग्ण आपल्याला कुठला आजार झालेला आहे याबद्दल साशंक असतात. तसेच झालेल्या आजाराबद्दल विविध बोलीभाषेतील शब्द वापरले जातात. साधारणता मुळव्याध म्हणजे मुलाच्या ठिकाणी होणारा व्याधी. साधारणता फिशर भगंदर आणि मुळव्याध या सर्वांचा पेशंट मुळव्याध म्हणून उल्लेख करतो. आलेल्या सर्व रुग्णांपैकी सत्तर टक्के लोक हे फिशर या व्याधीने ग्रासलेले असतात. दहा टक्के लोक हे बघा नगर आजाराने पीडित असतात तर 20 टक्के लोक हे कोंब मुळव्याध या व्याधीने त्रस्त असतात.
फिशर या व्याधीची लक्षणे- शौचाचा प्रथम भाग किंवा पूर्ण शौच हे खडक आकाराने मोठी असे झाल्यामुळे संडासाच्या जागेतून बाहेर पडताना तिथले स्नायू आणि त्वचा ताणली जाते ओळखली जाते आणि त्यामुळे तेथे जखम तयार होते. हीच जखम जुनी झाल्यावर त्याच्या शेवटच्या भागावर एक गाठी प्रमाणे कोम्ब तयार होतो. तो कोंब नेहमीच जखमे च्या खालच्या भागावर बाहेरच राहतो. त्या कोंबा च्या जागी दुखणे हा प्रकार नसतो परंतु जेव्हा जखम पुन्हा पुन्हा शेवटच्या वेळी ताणली जाते. त्यावेळी शौचानंतर आग होणे, जळजळ होणे, दुखणे अथवा संडासाला घासुन रक्त जाणे अशी लक्षणे दिसतात. साधारणत शौचानंतर दोन ते तीन तासापर्यंत ह्या जागी दुखणे राहते. काही लोक याला चिरेचा मूळव्याध असे देखील म्हणतात
शौचाला सारखा जोर केल्यामुळे अथवा जास्त वेळ बसणे प्रवास करणे अशा कारणांमुळे जेव्हा शौचाच्या भागावरील रक्तवाहिन्यांमध्ये रक्त भरून फुगल्यामुळे जे कोंब तयार होतात त्यांना साधारणता कोंब मूळव्याध असे म्हणतात. हे समजण्यासाठी आपण एखाद्या रुग्णाच्या पायावर फुगलेल्या निळ्या रंगाच्या नसा बघितल्या असतील. त्याचप्रमाणे रक्तवाहिन्या जेव्हा शौचाच्या जागी असतात तेव्हा त्यांना मूळव्याध असे म्हणतात. यात रक्त पडणे प्रामुख्याने पेशंटची तक्रार असते. रक्ताचे प्रमाण फिशर पेक्षा नक्कीच जास्त असते. काही वेळा हे कोंब शौचाच्या जागी च्या बाहेर येतात आणि स्वतःहून आत जातात. पण जेव्हा हे शेवटचा टप्पा गाठतात त्यावेळी हे कोंब बाहेरच राहतात.
भगंदर- या आजारांमध्ये शौचाच्या जागी भोवती एक छोटी पोचवणारी पीटी का उत्पन्न होते व त्यातून पु येणे रक्तमिश्रित पू येणे दुखणे अशी लक्षणे आढळतात. ह्यापी टीकेचा सरळ संबंध शौचाच्या आतल्या भागाशी असतो.
piles doctor in pune
ReplyDelete