मुळव्याध भगंदर अथवा फिशर असे आजार झाल्यावर अथवा अशा आजारांची ऑपरेशन्स झाल्यानंतर नियमितपणे डॉक्टर गरम पाण्याचा शेक घेण्याचा सल्ला देतात.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना ह्या पद्धतीविषयी थोडीबहुत माहिती असेल. मुळव्याध भगंदर अथवा फिशर असे आजार झाल्यावर अथवा अशा आजारांची ऑपरेशन्स झाल्यानंतर नियमितपणे डॉक्टर गरम पाण्याचा शेक घेण्याचा सल्ला देतात. पण त्याचा नेमका कसा फायदा होतो , ते का करावे याविषयी माहिती बऱ्याच जणांना नसते.lady doctor for Piles in Pune
शरीरात इतर ठिकाणी ऑपरेशन झाल्यानंतर त्या भागाची जखम ड्रेसिंग करून सात दिवसा करता, न हलवता अथवा त्या जागेची हालचाल न करता ड्रेसिंग करून जखम लवकरात लवकर भरून यावी अशी योजना केली जाते. परंतु याच्या उलट अगदी शौचाच्या जागी होणाऱ्या जखमा ह्या ड्रेसिंग करून बांधून ठेवता येत नाही. कारण दुसऱ्या दिवसापासून रुग्णाला त्या जागेचा वापर करणे गरजेचे असते. त्यामुळे त्या जागेला शौचाचा काही भाग लागून राहणे, अथवा शौचाच्या वेळेस जखमेवरून घासून जाणे यासारखे अडचणी येतात. यावर उपाय म्हणून त्या जागेची स्वच्छता राखणे आणि जखमेवर हात न लावता जखमेची स्वच्छता करणे, हा या गरम पाण्यात शेकल्याने उपयोग होतो. एकंदरीत गरम पाण्याने शेक घेतल्याने होणाऱ्या फायद्यांची उपयुक्तता खालील प्रकारे सिद्ध होते.
१) हात न लावता त्या जागेची स्वच्छता होणे. जखमेवर लागलेली अशुद्धी धुवून निघणे.
२) गरम शेक मिळाल्याने त्या जागेचा रक्तप्रवाह वाढतो त्या ठिकाणी जखमेच्या अवतीभवती असलेली रक्तातील अशुद्धी परत हृदयाकडे नेली जाते. म्हणजे एकंदरीत या जागी शुद्ध रक्ताचा प्रवाह वाढतो आणि जखम भरण्यास मदत होते.
३) त्याजागेची स्वच्छता झाल्यामुळे जखमेवरील ताण कमी होऊन तिथल्या वेदनाही कमी होतात.
४) नियमित प्रॅक्टिस च्या दरम्यान असे दिसून आले आहे की बरेच रुग्ण शेक घेतल्यानंतर अत्यंत आरामदायी अनुभव करतात. याच कारणामुळे दिवसातून तीन ते चार वेळा शेख घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
विठाई मुळव्याध उपचार केंद्र
कासारवाडी पुणे
लेझर क्षारसूत्र आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट उपलब्ध
स्त्रियांसाठी मूळव्याध उपचार केंद्र
Really very nice information. I went through many articles on this blog, I really loved to read them.
ReplyDeleteThank you for sharing.
Ayurvedic doctor in nashik
Thanks