भगंदर हा गुदभागी होणाऱ्या आजारांपैकीअत्यंत चिवट व त्रासदायक असा आजार आहे . या आजाराच्या उपचार पद्धती आणि उपचारानंतर होणारे तोटे याबद्दल बरेच गैरसमज जनमानसात आहेत. गुदद्वाराच्या मागील बाजूस असलेल्या anal glands infection होऊन पुययुक्त अशी नलिका तयार होते व त्यातून निरंतर असा स्त्राव होत राहतो. हा आजार रुग्णाला शारीरिक मानसिक व सामाजिक या तिन्ही स्तरांवर त्रासदायक ठरतो. लवकरात लवकर उपचार न घेतल्यास त्या पॖ युक्त नलिकेची लांबी आणि दिशा हि वाढतच राहते. काही रुग्णांमध्ये याची सुरुवात गुदद्वाराच्या भवती पु युक्त गाठ तयार होणे व ठसठससणाऱ्या वेदना होणे अशी लक्षणे दिसू लागतात. ह्याच गाठीमधून पुयाचा स्त्राव पूर्णपणे न झाल्यास त्याजागी भगंदर हा आजार निर्माण होतो.
पारंपरिक पद्धतीने क्षारसूत्र यावरील उत्तम चिकित्सापद्धती आहे. परंतु ह्या चार सत्र पद्धतीमध्ये बराच वेळ औषधोपचार घ्यावी लागणे बऱ्याच वेळा डॉक्टरांना उपचारादरम्यान भेटावे लागणे साधारणता तीन ते चार महिने ही पर्यंतही ह्या आजाराची उपचारपद्धती चालू राहते. ह्या सर्वांवर उत्तम उपाय अथवा पर्याय म्हणून लेझर ही सक्षम उपचार पद्धती उपलब्ध आहे. ह्या उपचार पद्धतीमध्ये पुयुक्त भगंदरची नलिका ही लेझर किरणांद्वारे पूर्णतः बंद करता येते ह्या मालिकेचा अंतर्भाग हा लेझर किरणांनी आतल्या बाजूने जळाल्यामुळे चिपकुन जातो. Ablation. ही प्रक्रिया करण्याआधी कमरेखाली भूल देऊन संपूर्ण मालिका ही आतून औषधीयुक्त द्रव्यांनी स्वच्छ केली जाते. भूले मुळे ही संपूर्ण प्रक्रिया ही वेदनारहित होऊन जाते. त्यानंतर लेझर किरणे आत मध्ये प्रविष्ट करून नलिका चिटकवली जाते. कमीत कमी वेळामध्ये अत्यंत उत्कृष्ट परिणाम देणारी ही लेझर ट्रीटमेंट आहे यामध्ये पेशंटला कुठल्याही मोठ्या जखमेचा त्रास सहन करावा लागत नाही. काही दिवसातच पेशंट आपल्या पूर्ववत कामावर जाऊ शकतो.
अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.
विठाई हॉस्पिटल जय महाराष्ट्र चौक जुना पुणे मुंबई हायवे कासारवाडी पुणे
Comments
Post a Comment